We can help. Please email or call:  +91 0241 2779111, 2777070, 6450365

 
 

 
 
 
About Us

Yashwantrao Balwantrao Chavan
(12 March 1913-25 November 1984)
was born in the village of Devrashtre in Satara District of Maharashtra. Popularly known as Saheb, he was from  a poor agriculture Maratha Family. From a very humble beginning he rose to meteoric heights. He was the First Chief Minister of Maharashtra and thereafter occupied the high poisitions of Defense Minister, Home Minister, Finance Minister, Foregin Minister and Deputy Prime Minister of India.

Yashwantraoji Chavan was responsible for many developmental intiatives in Maharashtra. The laws regrading Democratic Decentralizeed Bodies - Village Panchayats, his regime as Chief Minister. His vision of Agro - Industries with an emphasis on Co-operative Sector and regionally balanced Industrial Development of Maharashtra resulted in putteing the state in the fore front of the nation. His contribution to the field of education in the from of putting enormous educational centers in Maharashtra and providing a free education to economically backward classes (EBC), made it possible for generations of common man to see the light of knowledge.

This institute is a token of tribute to the great man..
 

गेली चार दशके मी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये वावरतो आहे. एक शिक्षक म्हणून सुरु झालेला हा प्रवास राजकारण, समाजकारण, सहकार, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये वाहता राहिला आहे. या दरम्यान मी पंचायत समिती अध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष, साखर कारखाना संस्थापक, जिल्हा बँक अध्यक्ष, आमदार, खासदार अशा राजकीय पदांवर काम केले आहे, करतो आहे. अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान, कोरिया, हॉलंड, इटली, स्वित्झर्लंड, थायलंड रशिया, अशा अनेकविध देशांमध्ये मी फिरलो. यातून मिळालेल्या व्यापक अनुभवांतून माझे शिक्षणाच्या महत्वाविषयीचे मत वृद्धिंगत होत गेले. याच प्रेरणेतून मी शेक्षणिक कार्याची सुरुवात १९७९ मध्ये केली. शाळांपासून सुरु झालेले हे कार्य नंतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, फार्मसी, एम.बी.ए., अग्रीकल्चर, शिक्षणशास्त्र अशा विविध महाविद्यालयीन शाखांमध्ये आज पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, सोनई येथे विस्तारले आहे. आज याच शृंखलेतील प्रगतीचा पुढचा टप्पा गाठणारे अहमदनगर येथील 'यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय' आपल्या हाती सोप्वितांना मला मनस्वी आनंद होतो आहे.
मी काम केलेल्या अनेक क्षेत्रांनी मला आयुष्यात यश, मानमरातब मिळवून दिला असेल, पण मला सर्वाधिक अभिमान आहे तो मी स्वत: एक शिक्षक होतो याचा. म्हणूनच मला प्रकर्षाने वाटते की, तंत्रज्ञानाच्या या जागतिक युगात आज गरज आहे ती योग्य शिक्षणाची आणि विद्यार्थाच्या सर्वांगिण विकासाची. या दंत महाविद्यालयात व्यवस्थापनाने सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. आता सर्व शिक्षक, सहकारी आणि विद्यार्थ्यांनी मिळून याचे एका उत्कृष्ट शेक्षणिक, आरोग्यसेवा व संशोधन केंद्रात रुपांतर करावे हीच माझी इच्छा आहे. या महाविद्यालयातून पदवी घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी भावी आयुष्यात प्रत्येक संधी मिळवावी आणि अनेक यशोशिखरे गाठवित. चांगला मानून आणि चांगला नागरिक बनून...
                                                                 -यशवंतराव गडाख पाटील